Share

‘पेट्रोल पंपावर मोदींचा पोस्टर तोंडावर रुमाल बांधलेला दिसतो, तो काय दर्शवतो ?’

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : सध्या दररोज इंधन दरवाढ होत आहे. इंधनाचे दर काही शहरांत शंभरी पार गेल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत. यामुळे कोरोना काळात आर्थिक घडी विसकटलेल्या सामन्यांच्या खिशावर अधिकच ताण वाढत आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल ८८.९९ रुपये प्रति लिटर आहे. तर, मुंबईत पेट्रोल ९५.४६ रुपये प्रति लिटर आहे.

विरोधकांनी इंधन दरवाढीचं खापर केंद्र सरकारवर फोडल्याच दिसून येत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी तेल उत्पादक देशांनी कृत्रिम स्वरुपात किंमती वाढवल्यामुळे इंधनवाढ होत असल्याचे म्हटले आहे. वाढत्या इंधन दरवाढीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली आहे.

‘हे घ्या सुरवात झाली “अच्छे दिन” च्या वचनाची…. जागतिक पातळीवर पेट्रोल – डिझेल चे दर कमी आहे परंतु सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मोदी सरकार, भाजपा सरकार दररोज लुटत आहे… पेट्रोल पंपावर मोदी जी चा पोस्टर तोंडावर रुमाल बांधलेला दिसतो तो काय दर्शवतो ?’ असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!