आगरतळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आगरतळा येथील एका कार्यक्रमादरम्यान बिप्लब देव म्हणाले की, अमित शहा केवळ भारतातच नव्हे तर शेजारच्या नेपाळ, श्रीलंकेतही पक्षाचे सरकार आणण्याचा विचार करत आहेत. भाजपला एक ग्लोबल पक्ष म्हणून पुढे आणण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असल्याचे ते म्हणाले. देव यांच्या वक्तव्यानंतर देशभरात नवीन वादाला तोंड फुटले आहे.
बिप्लब देव म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी नेपाळ आणि श्रीलंकेत आपले सरकार बनवण्याची योजना आखली होती. मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी 2018 मध्ये अमित शहा यांच्याशी झालेल्या संभाषणाचा संदर्भ देत म्हटले की, अमित शहा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी हे बोलून दाखवले होते.
ते म्हणाले की, त्यावेळी पक्षाच्या बैठकीत अमित शहा यांनी भारतातील सर्व राज्ये जिंकल्यानंतर परदेशातही पक्षाचा विस्तार करण्यावर चर्चा केली. या संभाषणाच्या आधारे, बिप्लब देव म्हणाले की, आम्ही गेस्ट हाऊसमध्ये बोलत होतो, ज्यामध्ये अजय जामवाल म्हणाले की, अनेक राज्यांत भाजपने आपले सरकार स्थापन केले आहे, त्यास अमित शाह यांनी उत्तर दिले की, आता श्रीलंका आणि नेपाळमध्येही विस्तार करायचा आहे.
याशिवाय मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी पुढच्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, आत्मनिर्भर दक्षिण आशिया बनविण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल आहे. भारताची धोरणे व कृती बांगलादेश, भूतान आणि नेपाळला स्वावलंबी बनविण्यात सक्षम आहेत.
मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्या विधानानंतर विरोधी पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कॉंग्रेसने त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोन्ही पक्षांनी बिप्लब देव यांच्या विधानाला दडपशाही म्हटले आहे. यावरून अमित शहा यांच्या परदेशात कट्टरता पसरवण्याचा हेतूही उघड झाल्याची टीका करण्यात आली. यावर आता दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- वार्षिक नियोजन आराखडा ३५० कोटींपर्यंत वाढवा, आ.पाटलांचे अजित पवारांना साकडे
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, गडकरींनी टोचले स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान
- ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिशानंतर आता निकिता जेकब विरोधात अटक वॉरंट
- पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवणाऱ्या ‘या’ भाजप आमदाराला येताहेत धमकीचे फोन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

