चेन्नई : चेन्नईमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना सुरू आहे चेन्नईच्या पिचनं पहिल्या दिवसापासून स्पिनर्सला मदत केली आहे. दुसऱ्या दिवशी तर या पिचवर भारताच्या पाच आणि इंग्लंडच्या 10 अशा एकूण 15 विकेट्स गेल्या. चेन्नईच्या पिचवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी आक्षेप नोंदवला आहे. त्या आक्षेप घेणाऱ्या मंडळींना भारताचे महान खेळाडू सुनील गावसकर यांनी चोख उत्तर दिलं आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी ‘स्टार स्पोर्ट्स’ वरील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
“रोहित शर्मानं दीडशतक झळकावल्याचं आपण पहिल्या दिवशी पाहिलं आहे. या पिचवरही बॅटिंग करता येते हे रोहित शर्मानं दाखवून दिलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये स्विंग बॉलिंगला मदत करणारे पिच बनवण्यात येते. तेथील पिचवर पहिल्या दिवसापासून बॉल स्विंग व्हायला लागतो. तेव्हा कुणीही बोलत नाही. हा प्रश्न नेहमी भारतीय पिचवर बॉल फिरायला लागला की विचारला जातो.” असं गावसकर यांनी स्पष्ट केलं.
” हे खेळण्यासाठी अयोग्य नाही, आव्हानात्मक आहे. क्रिकेट हे असंच असायला हवं. पहिल्या टेस्टमधील पहिले दोन दिवस काहीही घडले नाही. त्यावेळी सर्वांनी हा कंटाळवाणा प्रकार आहे. बॅटिंगला मदत करणारं पिच आहे, अशी टीका केली होती. तुम्ही यामध्ये संतुलन साधलं पाहिजे. तुम्ही सतत टीका करणे योग्य नाही,” असा सल्ला गावसकर यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या लाइनमनवर ऑइल टाकून मारहाण
- पहिल्या एल्गार परिषदेचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे निधन
- एमसीएच विंगला मिळणार हिरवा कंदिल..? वैद्यकीय शिक्षणमंत्री आज घाटीत
- ‘२२ वर्षीय विद्यार्थिनी देशासाठी धोका असेल तर देश कमकुवत मुल्यांवर उभा आहे.’
- उदगीरच्या पोलीस अधिकाऱ्याची पोलीस ठाण्यात आत्महत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
