🕒 1 min read
बीड : नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वेळकाढूपणामुळे बीड शहरातील हद्दवाढीत सामविष्ट झालेल्या अनेक भागांचा विकास खुंटला आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार संदीप क्षीरसागर आणि नगराध्यक्ष क्षीरसागर, त्यांचे बंधू जयदत्त क्षीरसागर हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच्यातील ‘तुतु-मैंमैं’मुळे बीडकरांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते आ.विनायक मेटे यांनी केला.
शहरातील रेणुका नगरातील सिमेंट रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन आमदार मेटे यांच्या हस्ते झाले. यावेळी सुहास पाटील, सुधीर काकडे, रामहरी मेटे, अनिल घुमरे, विनोद कवडे, गणेश धोंडरे, सचिन कालकुटे, दगडू गायकवाड, दत्ता गायकवाड, विजय सुपेकर, राजेंद्र आमटे उपस्थित होते.
विनायक मेटे म्हणाले, दोन्ही क्षीरसागरांमध्ये वाद नाही. सर्व काही सत्तेसाठी चालले आहे. सत्ता मिळवायची आणि आपापसांतील वादाचे राजकारण करून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे. असे सोयीचे राजकारण काका-पुतणे खेळत आहेत. मात्र, त्यांचे राजकारण आता बीडकरांच्या चांगले लक्षात आले आहे. रेणुका नगरमधील रस्ते, नाल्याचा प्रश्न शिवसंग्रामच्या वतीने लवकर मार्गी लावण्यात येईल, असे वचन मी आपणाला दिले होते असे मेटेंनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या लाइनमनवर ऑइल टाकून मारहाण
- पहिल्या एल्गार परिषदेचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे निधन
- एमसीएच विंगला मिळणार हिरवा कंदिल..? वैद्यकीय शिक्षणमंत्री आज घाटीत
- ‘२२ वर्षीय विद्यार्थिनी देशासाठी धोका असेल तर देश कमकुवत मुल्यांवर उभा आहे.’
- उदगीरच्या पोलीस अधिकाऱ्याची पोलीस ठाण्यात आत्महत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
