🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : कलम ३७० ने भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू काश्मीर राज्य भारताला जोडले होते. मात्र भाजप सरकारने हे जोडलेले राष्ट्र तोडले आहे, असा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे. नेहरूंनी या राज्याला विशेष दर्जा देऊन स्वतंत्र अधिकार दिले होते. मात्र या सरकारने ते स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे, अशी टीका विरोधकांनी सभागृहात केली. यावर जम्मू काश्मीरचे भाजप खा. जुगल शर्मा यांनी आक्रमक पवित्रा घेत. विरोधकांनी केले आरोप खोडून काढले.
खा. जुगल शर्मा म्हणाले की, पंडित नेहरूंनी काश्मीर जोडले नसून ते तोडले आहे. नेहरूंनी भारताला POK दिल. सरदार वल्लभभाई पटेल , डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोध करत असताना देखील त्यांनी पाकिस्तानशी चर्चा केली. त्यामुळे नेहरूंनी काश्मीरला स्वातंत्र्य दिले नसून भय, बेरोजगारी, आणि भ्रष्टाचार दिला आहे. कलम ३७० ने बेरोजगारी वाढली, विकास खुंटला, घुसखोरी झाली, निष्क्रिय सरकारे स्थापन झाली. तसेच आज खोऱ्यात कमालीची बेरोजगारी आहे. निरक्षरता आहे. भ्रष्टाचाराला मोजमाप नाही. त्यामुळे नेहरूंनी जम्मू-काश्मीरला कलम 370मध्ये अडकवून केवळ भय, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार दिला आहे, असे म्हणत जुगल शर्मा यांनी विरोधकांवर प्रतिहल्ला केला.
दरम्यान आज लोकसभेत 370 कलम हटवण्याबाबत चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु असतना सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार टोलेबाजी होत आहे. देशाच्या वरिष्ठ सभागृहात सोमवारी पहिली प्रक्रिया पार पडली. राज्यसभेत ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव बहुमताने संमत झाला. हा प्रस्ताव समंत झाल्यानंतर देशातील उच्चभ्रू मंडळींनी सरकारवर नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने हे कलम काढण्याचे धाडस केले आहे. ते दाखवताना लोकशाही परंपरा आणि पद्धती यांचा आदर झाला असता तर हे धाडस अधिक स्वागतार्ह ठरले असते, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
जम्मू-काश्मीरसंदर्भात संविधानाचं पालन झालेलं नाही, सभागृहात कॉंग्रेस नेता आक्रमक
भाजपचा काश्मीरच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर डोळा, मेधा पाटकरांचा हास्यास्पद आरोप
‘मोदींचा भारतरत्न देऊन सन्मान केला पाहिजे’
#Article370 : सरकारच्या निर्णयावर राज ठाकरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
