Share

भाजपचा काश्मीरच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर डोळा, मेधा पाटकरांचा हास्यास्पद आरोप

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवण्याची शिफारस राज्यसभेत केली, शहा यांनी सभागृहात संसोधन विधेयक मांडताच कॉंग्रेससह इतर विरोधकांनी थयथयाट केला. सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे.

तर काही महाभाग या ऐतिहासिक निर्णयाला विरोध करत आहेत. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी हास्यस्पद आरोप भाजप आणि सरकारवर केले आहेत. मेधा पाटकर यांनी थेट सरकारच्या हेतूवर संशय़ घेतला आहे. हा निर्णय सरकारने त्या ठिकाणची नैसर्गिक साधन संपत्तीवर डोळा ठेऊन घेतला असल्याचं म्हटले आहे. भाजपला 370 कलमाविषयीचे मत वेगळेच होते. काश्मीरी जनतेचे मत विचारात घेतले गेले नाही असेही मेधा पाटकर म्हणाल्या आहेत.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला बहुतांश नागरिक,राजकीय पक्ष,संघटना या निर्णयाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. अनेक ठिकाणी जल्लोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पुण्यातील कोथरूडच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. फेसबुकवर कुलकर्णी यांनी जी पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यांनी ३७० कलम हटवल ७२ वर्षानंतर काश्मिरची सुटका झाली असं म्हटलं आहे. जहाँ हुए बलिदान मुखर्जी । वह कश्मीर हमारा है । असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमितजी शाह यांचा मास्टरस्ट्रोक असल्याचं कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील आपली भावना व्यक्त केली आहे. भारतीय इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक व सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस म्हणून ओळखला जाईल. कलम ३७० रद्द करण्यात आल्याने खऱ्या अर्थाने जम्मू आणि काश्मिर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे प्रकर्षाने अधोरेखित झाले असं पाटील यांनी म्हटलं आहे.

खासदार संभाजीराजे यांनी देशाला एकत्र करणारा आजचा निर्णय छत्रपती शिवरायांना सुद्धा आवडला असणार अस म्हणत या निर्णयाला पाठींबा दिला आहे.देशाला एकत्र करणारा निर्णय छत्रपती शिवरायांना सुद्धा आवडला असणार. प्रत्येक भारतीयांचे स्वप्न आज पूर्ण झाले असे उद्गार खासदार संभाजीराजे यांनी काढले आहेत.

#Article370 : लोकशाही मानणाऱ्या प्रत्येकाने ओमर अब्दुल्ला यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे

कलम ३७० हटवण्याला केजरीवालांचा सरकारला पाठींबा

#Article370 : पीडीपीच्या दोन खासदारांनी केला देशाचे संविधान फाडण्याचा प्रयत्न

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!