Share

स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपला करायची होती ही खेळी? शिवसेना संपर्कप्रमुखांनी केला गौप्यस्फोट

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस नगर महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदाची निवड झाली. स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून मनोज कोतकर यांचे नाव अंतिम असल्याचे सांगण्यात येत असतानाच मनोज कोतकर यांनीच राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. त्यामुळे महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ, असे सांगण्यासाठी भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे हे रात्री साडेबारा वाजता शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांना भेटले होते. काल खुद्द कोरगावकर यांनीच हा गौप्यस्फोट शिवसैनिकांसमोर केला. मात्र मी त्यांना वरिष्ठांचा निर्णय पाळणार असल्याचे सांगत जय महाराष्ट्र केला, असेही ते म्हणाले.

अहमदनगरमध्ये स्थायी समिती सभापती निवडणुकीत राजकीय भूकंप पाहायला मिळाला होता. या निवडणुकीत सभापतीपदी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले मनोज कोतकर यांना संधी मिळाली होती. मनोज कोतकर यांच्या विरोधात शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी हा अर्ज मागे घेतला. नगर शिवसेनेत उफाळून आलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी काल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

त्या बैठकीत भाऊ कोरगावकर यांनी शिवसैनिकांसमोर स्थायी समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घडलेल्या घडामोडी सांगत एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, स्थायी समिती सभापती निवडीच्या आदल्या रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान महापौर बाबासाहेब वाकळे मला भेटले होते, त्यांनी मला विचारले तुमचा फॉर्म ठेवणार का नाही? त्यावर मी म्हणालो, ते वरती ठरेल. त्यावर ते म्हणाले, तुम्ही फॉर्म ठेवा, आम्ही मतदान करू. पण मी त्यांना स्पष्ट सांगितले, जे आमच्या पक्षात वरून ठरते ते आम्ही करतो.

यानिमित्ताने मात्र नगर महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपचा शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन नवीन खेळी करण्याचा डाव होता. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!