Share

सोलापूरमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता; एमआयएम फुटीच्या उंबरठय़ावर

Published On: 

सोलापूर- सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकीय भूकंप घडविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एमआयएमचे नेते तौफिक शेख हे राष्ट्रवादीचे वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.

कांही दिवसांपूर्वीच एम आय एम चे नेते तौफिक शेख ( पाहिलवान ) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या उपाध्यक्ष विद्या लोलगे यांच्या मध्यस्थीने सर्व नऊ नगरसेवकांसह भेट घेतली. त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

लोकसत्ताला दिलेल्या प्रतिक्रियेत शेख म्हणतात,सोलापूरमध्ये एमआयएम पक्षाची मजबूत बांधणी केली होती. त्यातून यशही मिळाले. त्याचा परिणाम म्हणूनच मला हत्येच्या खोटय़ा गुन्ह्य़ात गोवले गेले. दुर्दैवाने एमआयएम पक्षश्रेष्ठींनी पाठबळ दिले नाही. आता वेळ निघून गेली आहे. माझे जे चांगले-वाईट काम आहे ते लोकांसमोर आहे. एमआयएमवर नाराजी कायम असून सामाजिक हित लक्षात घेता पुढील राजकीय निर्णय घेण्याची वेळ आली आहे. सात नगरसेवकांना बरोबर घेऊन निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, शेख हे जर राष्ट्रवादीच्या गळाला लागले तर शहरातील राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दरम्यान, तौफिक पहिलवान हे राष्ट्रवादीमध्ये जाण्यासाठी अनुकूल असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूरमध्ये मोठे राजकीय भूकंप घडवून आणले तर आश्चर्य वाटायला नको.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!