मुंबई: महाविकासआघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात उभे करण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप केला. भाजपचे सरकार असताना आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार कायदा केला. हे करताना ओबीसी समजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावण्यात आला नव्हता. मात्र, आताच्या सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे अशी टीका देखील त्यांनी केली.
दरम्यान, लोकांची समजूत काढता येत नाही म्हणून त्यांच्यात संभ्रम पसरवला जात आहे. यामधूनच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे मग ओबीसींच्या कोट्यातून द्यायचे का, अशी नवी टूम काढण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मराठा समाजाला आवाहन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र जळतो तेव्हा सरकार नाही तर सामान्य माणूस जळतो. त्यामुळे आम्हाला उद्रेक नको, सनदशीर मार्गाने आंदोलन करा. आम्ही हा तिढा सोडवण्यासाठी सरकारसोबत आहे. आम्ही विरोधकांची भूमिका घेतलेली नाही. सरकारला संपूर्ण सहकार्य करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :-
- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन
- ‘प्रकाश आंबेडकरांनी छत्रपती संभाजी राजे, उदयनराजेंबद्दल अनुद्गार काढणे योग्य नाही’
- नाथाभाऊंनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही; चंद्रकांत पाटलांची भावनिक साद
- नगर शिवसेनेत उफाळून आलेल्या वादावर अखेर पडदा; शिवसेनेचा प्रवास एकीच्या दिशेने!
- नागपुरात मास्क न लावणा-या १०७८४ बेजबाबदार नागरिकांविरोधात कारवाई


