Share

‘कोरोना काळात फेसबुकवर कोरडे उपदेश देणाऱ्याला कशाचे श्रेय?’ भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल २६ ऑगस्टरोजी ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ ला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कोरोना  काळात राज्याचं अर्थचक्र सुरु राहण्यासंदर्भात करण्यात आलेल्या आणि औद्योगिक क्षेत्रातील भविष्याच्या वाटचालीसंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी कोरोना काळात महाराष्ट्राला सावरण्याचं श्रेय माझ्या एकट्याचं नाही तर आपल्या सर्वांचं असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र यावरूनच भाजपचे अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

कोरोना काळात गेली दीड वर्ष घरी बसून फेसबुक लाईव्हवर जनतेला कोरडे उपदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्याला कोण श्रेय देणार आहे? असा सवाल करत त्यांनी आपलं श्रेय आपण घेतलं तरच मिळेल. अशी खोचक टीका केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री ठाकरेंनी ‘माझं कौतुक होत आहे की या कोरोनाच्या कठीण परिस्थितीमध्ये कसा महाराष्ट्र संभाळला. पण हे श्रेय माझं एकट्याचं नाही. माझे मंत्रीमंडळातील सहकारी, प्रशासनातील सर्व अधिकारी, सारे कर्मचारी अगदी सफाई कर्माचारी सुद्धा आणि साहजीकपणे आपल्या राज्यातील नागरिक तसेच प्रसारमाध्यमांनी दिलेली साथ महत्वाची ठरली. तुम्ही जी साथ देत आहात ती त्यावेळेला दिली नसती तर हे कठीण होतं,’ असे म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले. मात्र यावरूनही भाजपने टीका करण्याचा मौका सोडलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!