Share

ब्रिटनचा ‘तो’ इशारा खरा ठरला; काबूल विमानतळावर मोठा बॉम्बस्फोट

Published On: 

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्यापासून तेथील नागरिक काही करून देश सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. भारतासह अमेरिका, युएई आणि अन्य देशांनी आपापल्या देशातील नागरिकांसह व्हिसा असलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम चालवली आहे. दरम्यान, काबुल येथील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आल्याने प्रचंड ताण आणि भीती देखील अधिक असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

अशातच, ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेकडून मोठ्या हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. ‘हा असा धोका आहे ज्याबद्दल मी अधिक माहिती देऊ शकत नाही परंतु, हा धोका अत्यंत जवळ, खूप विश्वसनीय आणि घातक आहे’ असं ब्रिटनचे संरक्षण मंत्री जेम्स हिप्पी यांनी म्हटलं होतं. गुप्तचर इनपुटमध्ये असे म्हटले जात होते की हा हल्ला इसिसकडून केला जाऊ शकतो. यानंतर अमेरिकेसह अन्य काही देशांनी आपल्या नागरिकांना विमानतळापासून दूर सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देतानाच सावधानतेचा इशारा दिला होता.

गुरुवारी सायंकाळी काबूल विमानतळावर आत्मघाती हल्ला झाल्याची बातमी समोर येतेय. या आत्मघाती हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. अमेरिकेचे ‘असिस्टंट सेक्रेटरी ऑफ डिफेन्स फॉर पब्लिक अफेअर्स’ जॉन किर्बी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काबुल विमानतळाबाहेर हा स्फोट झालाय. अद्याप या घटनेबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!