पुणे : गेले महिनाभर पुणे शहरात दररोज सरासरी १५० ते २५० नव्या कोरोना बाधितांची संख्या नोंदवण्यात येत आहे. तर, कोरोना मुक्तांचा आकडा देखील नव्या बाधितांपेक्षा अधिक होता. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुणे शहरात निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. तरीदेखील कोरोना चाचण्यांचे प्रमाण हे अधिक राहावे यासाठी प्रशासन काम करत आहे. दरम्यान, सण, उत्सवांचा काळ हा सुरु होत असतानाच आता पुणेकरांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.
काल कोरोना रुग्णांमध्ये अधिक वाढ झाल्याचं नोंदवण्यात आलं होतं. काल दिवसभरात ३९९ बाधितांची नोंद झाल्याने धोक्याची घंटा असल्याचं बोललं जात होतं. आज रोजी काल पेक्षा कमी नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असली तरी सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये मात्र वाढ झाली आहे. पुणे शहरात आज नव्याने २८२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९४ हजार ४६७ इतकी झाली आहे.
दरम्यान, कोरोनामुक्तांच्या संख्येत घट झाली आहे. आज शहरातील १२२ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ८३ हजार ३४३ झाली आहे. तर, आज एकाच दिवसात ९ हजार २७८ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३० लाख ९२ हजार ०७१ इतकी झाली आहे. यासोबतच, उपचार घेणाऱ्या २ हजार २२२ रुग्णांपैकी २१० रुग्ण गंभीर तर २७९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. नव्याने ४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ९०२ इतकी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- निर्बंध शिथिल झाल्यानंतर मास्कचा वापरही झाला कमी, मास्क विक्रीत मोठ्या प्रमाणावर घट
- ‘शिवसेना सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात ती शिवसेनाच राहील ,तुम्ही मर्यादा ओलांडली तर..’, राऊतांचा इशारा
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : आता ‘या’ अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील लागू होणार अनुकंपा धोरण
- जन आशीर्वाद यात्रेला विरोध केला तर जशास तसं उत्तर देणार – प्रमोद जठार
- ‘मुका मोर्चा म्हणाला तेव्हा संजय राऊत तुम्ही गांजाची की अफूची गोळी घेतली होती?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

