Share

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत सब स्टेशनजवळ गळती; दोन दिवस औरंगाबादकरांवर जलसंकट!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या १०० दलली योजनेच्या १२९९ मीमी व्यासाच्या अशुद्ध जलवाहिनीवर जायकवाडी येथील नवीन पंपगृहाजवळ वेल्डिंग निखळल्याने मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झालेली आहे. या गळतीचे ठिकाण नवीन योजनेच्या विद्युत सब स्टेशन लगत आहे. गळती अचानक वाढून पाणी सब स्टेशनमध्ये गेल्यास मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. त्यामुळे शुक्रवारी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असून पुढचे दोन दिवस औरंगाबादकरांवर जलसंकट राहणार आहे.

त्याचप्रमाणे मोठ्या स्वरूपातील पाणी अपव्यय लक्षात घेता या गळतीच्या दुरुस्तीकरिता शुक्रवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपासून नवीन योजनेवर खंडणकाळ घेण्यात येणार आहे. याच खंडणकाळात फारोळा फाटा येथील स्कावर व्हॉल्व्ह मधील गळती दुरुस्त करणे, नक्षत्रवाडी एम.बी.आर येथील २ गळत्या दुरुस्त करणे, जालाननगर येथे २ एअर व्हॉल्व्हचे पाईप बदलणे तसेच रेल्वे क्रॉसिंग नजीक १४०० मीमी व्यासाच्या गुरुत्व वाहिनीवर असलेली गळती बंद करणे ही कामे देखील केली जाणार आहेत. याशिवाय जायकवाडी ते शहरापर्यंत नवीन योजनेवरील पंपिंग मशिनरी दुरुस्ती तसेच विद्युत विषयक कामे देखील यांत्रिकी विभागामार्फत करण्याचे नियोजन आहे.

या सर्व कामांसाठी मुख्यत्वे १२९९ मिमी व्यासाची जलवाहिनी रिकामी करणे, दुरुस्ती नंतर जलवाहिनीमध्ये पाणी भरून घेणे यासह वरील कामांसाठी साधारणतः १२ तासांचा कालावधी लागणार आहे. या खंडण काळामुळे उद्या शुक्रवारी शहर व सिडको परिसराला पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा एक दिवसांनी पुढे ढकलण्यात आला आहे. कामाची अत्यावश्यकता लक्षात घेता काम त्वरित करणे गरजेचे असल्यामुळे या कामासह इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!