Share

‘मुका मोर्चा म्हणाला तेव्हा संजय राऊत तुम्ही गांजाची की अफूची गोळी घेतली होती?’

Published On: 

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंच्या टीकेनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. सेना-भाजपच्या नेत्यांमध्ये टीकांचे धारदार बाण एकमेकांवर सोडले जात आहेत. मुंबई, कोकणसह विविध जिल्ह्यांमध्ये शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले.

तर, भाजपने देखील आता शिवसेनेसह मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. गेल्या २ दिवसांच्या राजकीय नाट्यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाद्वारे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणेंसह भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर त्यांची नशा लवकरात लवकर उतरो हीच ‘अटल’चरणी प्रार्थना, दुसरे काय बोलायचे! कायद्याचे राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे गांजा मारून पडण्याइतके सोपे नाही,’ अशी टीका आज सामनातून करण्यात आली.

याला भाजप नेते प्रमोद जठार यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘संजय राऊत आणि फडणवीस यांच्याकडे बघितलं तर नक्की गांजा कोण प्यायला आहे, हे लक्षात येतं. मराठा समाजाने मूक मोर्चा काढला होता. त्यात माता भगिनीही सामील झाल्या होत्या. मात्र त्यावेळी सामनाच्या मुख्य पानावर व्यंग चित्र छापत मुका मोर्चा लिहिणाऱ्या संजय राऊत यांनी त्यावेळी गांजाची की अफूची गोळी घेतली होती?’, असा खोचक सवालही प्रमोद जठार यांनी विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!