Share

ENG vs IND : विराटसोबत मैदानात काय घडलं? जॉनी बेअरस्टो म्हणतो, “गेल्या १० वर्षांपासून..”

Published On: 

मुंबई : भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यात बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात थरार सुरू आहे. भारताने पहिल्या डावात केलेल्या ४१६ धावांना प्रत्युत्तर देताना यजमानांचा संघ पहिल्या डावात २८४ धावांत आटोपला. पहिल्या डावाच्या जोरावर १३२ धावांची आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३ गडी गमावून १२५ धावा केल्या. भारतीय संघाने आता इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या डावात एकूण २५७ धावांची आघाडी घेतली आहे. सामन्याला अजून २ दिवस बाकी आहेत.

बर्मिंगहॅम कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहली आणि इंग्लिश फलंदाज जॉनी बेअरस्टो यांच्यात जोरदार वादावादी झाली. हा संपूर्ण वाद इंग्लंडच्या डावाच्या ३२ व्या षटकात झाला. मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता. शमीच्या अचूक लाइन लेन्थमुळे बेअरस्टो चांगलाच अडचणीत आला होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बेअरस्टोला फटका बसला. हा चेंडू पटकन आत आला आणि स्टंपच्या वरून गेला. बेअरस्टो थोडक्यात बचावला. यानंतर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कोहलीने बेअरस्टोविरुद्ध स्लेजिंग करण्यास सुरुवात केली. बेअरस्टो चेंडू सोडून सर्व काही पाहू शकतो, असा टोला विराटने लगावला.

बेअरस्टोने कोहलीला गप्प बसण्यास सांगितले. यानंतर कोहली त्याच्याजवळ पोहोचला आणि दोघांमध्ये भांडण सुरू झाले. प्रकरण वाढत असल्याचे पाहून पंचांनाही यावे लागले. त्यानंतर दोघेही शांत झाले. पण, स्लिपकडे जात असताना कोहलीने बेअरस्टोला तोंड बंद ठेवण्याचा इशारा केला आणि शांतपणे फलंदाजी करण्यास सांगितले. या वादानंतर बेअरस्टोने शतक ठोकले.

मैदानात कोहलीसोबत झालेल्या वादावर बेअरस्टोने प्रतिक्रिया दिली. सामन्यानंतर तो म्हणाला, ”गेल्या १० वर्षांपासून आम्ही एकमेकांविरुद्ध खेळत आहोत. हा एक प्रकारचा मजेदार उपक्रम आहे. आम्ही कसोटी क्रिकेट खेळत आहोत आणि आम्ही दोघेही प्रतिस्पर्धी आहोत. आपल्याला आपले सर्वोत्तम द्यायचे आहे. तुम्‍हाला तुमच्‍या संघाला खेळात पुढे घेऊन जायचे आणि त्यासाठी जे काही आवश्‍यक आहे ते करायचे आहे. तो खेळाचा भाग आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!