Share

बीसीसीआयकडून श्रीलंकेला ‘बॅक अप’ टीम तयार ठेवण्याची सूचना

Published On: 

श्रीलंका : भारतीय संघ सध्या श्रीलंका आणि इंग्लंड दौऱ्यावर आहे. यादरम्यान श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाच्या कार्यक्रमात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यानंतर आगामी मालिकेसंदर्भात श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मालिका पुढे ढकलण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला होता.

श्रीलंका क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने श्रीलंकेच्या खेळाडूंचे हॉटेल बदलण्याची विनंती केली होती. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ही विनंती मान्य केली आहे. या निर्णयानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांच्या क्रिकेट संघाला भारतीय खेळाडू राहत असलेल्या हॉटेलपेक्षा दिड किलोमीटर दुर असलेल्या हॉटेलमध्ये हलवले आहे. कोरोनाचा शिरकाव भारतीय संघात होऊ नये म्हणून बीसीसीआयने ही विनंती केली होती.

यादरम्यान भारताविरुद्धच्या मालिकेच्या वेळापत्रकातही थोडासा बदल करण्यात आला आहे. भारताविरुद्धची मालिका १३ जुलै ऐवजी १८ जुलैला सुरुवात होत आहे. त्याचबरोबर श्रीलंका क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयनं गंभीर इशारा दिला आहे. बीसीसीयानं श्रीलंकेला बॅक अप टीम तयार ठेवण्याची सूचना केली आहे. श्रीलंका क्रिकेट टीमच्या संबंधित व्यक्तींमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर पर्याय म्हणून बॅक टीम तयार करण्याची सूचना बीसीसीआयनं केली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!