मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्या नंतर खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यांच्या ऐवजी डॉ. भागवत कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. काल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे. तरीही त्यांचे समर्थक मात्र पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावरून संताप व्यक्त करत राजीनामे देत आहेत.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा सत्राची दखल केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे. याविषयीच बोलण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे या तातडीने दिल्लीला रवाना झाल्या आहेत. दिल्लीत त्या पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या दिल्ली भेटीतून नाराजीवर उपाय निघणार की मुंडे काही मोठा निर्णय घेणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
पंकजा यांच्या 49 समर्थकांनी विविध पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंकजा यांनी समर्थकांची मुंबईत बैठक बोलावली आहे. येत्या मंगळवारी ही बैठक होणार असल्याचं भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले. त्यामुळे पंकजा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पैठणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास प्रशासनच जबाबदार?
- शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांवर निकम यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले
- प्रशिक्षकानंतर आता श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूला कोरोनाची लागण
- अबू आझमीच्या पुतण्याला एनसीबीचे समन्स
- जि.प.शाळांची बांधणी, दुरुस्तीकामे तात्पुरती स्थगित करावी, शिक्षण सभापतींची राज्यमंत्री सत्तारांकडे विनंती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

