Share

पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी उद्या होणार मतदान

Published On: 

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला आहे. उद्या पहिल्या टप्प्यातील ३० जागांसाठी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून ते डझनभर केंद्रीय मंत्र्यांसह मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिल्या टप्प्यासाठी प्रचाराचं रान उठवून दिलं होतं.

पण या रणधुमाळीत काँग्रेसचा आवाज मात्र क्षीण दिसत होता. पहिल्या टप्प्याच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दिसल्या नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काँग्रेसच्या या खेळीमागे भाजपला रोखणं आणि ममता बॅनर्जींना फायदा पोहोचवणं हाच हेतू असल्याचं बोललं जात आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या २७ मार्चला होत असून उद्या एकूण ५ जिल्ह्यांमधील ३० मतदारसंघांसाठी मतदान होईल. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पुरुलिया, बांकुरा, पूर्व मिदनापूर, पश्चिम मिदनापूर आणि झारग्राम या पाच जिल्ह्यांमध्ये मतदान होईल. या मतदार संघात एकूण २२,६४,७३४ मतदार आहेत. त्यापैकी ११,५७,६१८ पुरुष आणि ११,१६,१०३ महिला मतदार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये मागील १० वर्षांपासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे आणि यावेळी ममता बॅनर्जी हॅटट्रीक करण्याच्या प्रयत्नात आहेत. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमध्ये एकाच वेळी काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी आणि भाजपप्रणित या दोन आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

कोणत्याही परिस्थितीत बंगाल भाजपच्या हाती जाऊ नये म्हणून गांधी कुटुंबाने प्रचारात भाग घेतला नाही. प्रचारात भाग न घेता ममता बॅनर्जींना काँग्रेसने मोकळं रान करून दिलं आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि मतदारांना जो मेसेज जायचा तो गेला असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या या अनपेक्षित खेळीमुळे भाजपची मात्र चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. तिरंगी लढत झाली असती तर काँग्रेस आणि टीएमसीच्या मतांमध्ये विभागणी झाली असती. त्याचा फायदा भाजपलाच झाला असता, असं भाजपला वाटत होतं. पण काँग्रेसच्या खेळीने भाजपला टेन्शन दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!