Share

अबकी बार दीदी २०० पार, भाजपची शंभरीत दमछाक !

Published On: 

कोलकता : आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पद्दुचेरी या विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर होणार आहे. पाच राज्यात जरी निवडणूक असले तरी संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालांकडे लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर आहे. खेला होबे म्हणून ममता बॅनर्जी यांनी भाजपला आव्हान दिले होते.

सुरुवातीच्या कलामध्ये तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसने २०२ जागांवर आगाडी घेतली आहे. तर भाजप ८८ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला मोठा फटका बसतांना दिसत आहे. नंदीग्राममध्येही ममता बॅनर्जी आणि शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. भाजपचे शुभेन्दु अधिकारी आघाडीवर आहेत.

तृणमूल कॉंग्रेसच्या या अतिभव्य विजयावर तृणमूल काँग्रेसचे महासचिव पार्थ चॅटर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मध्य प्रदेश, बिहार या राज्यांवर कब्जा करणाऱ्या भाजपचा विजयरथ ममता बॅनर्जी यांनी रोखला असे, वक्तव्य तृणमूल काँग्रेसचे महासचिव पार्थ चॅटर्जी यांनी केले. भाजपच्या प्रमुख विरोधक म्हणून ममता बॅनर्जी उदयाला आल्या आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आवाज उठवला, असे पार्थ चॅटर्जी यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!