मुंबई : देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये सुरुवातील कडवी झुंज सुरु होती. मात्र, नंतर तृणमूल काँग्रेसने चांगली आघाडी घेत भाजला मागे सोडले आहे. सध्या सर्व जागांचे कल हाती येत आहेत. पश्चिम बंगाल निवडणुकीकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
सुरुवातीच्या कलामध्ये तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसने १९४ जागांवर आगाडी घेतली आहे. तर भाजप ९४ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला मोठा फटका बसतांना दिसत आहे. ते सध्या ५ जागांवर आघाडीवर आहेत.
चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील 200 +चे स्वप्न भांगताना पाहून खूप वेदना झाल्या. भाजपचे अनेक महादिग्गज प.बंगाल मध्ये आले,मिथुनदापण आले, सगळे व्यर्थ गेले. 4 वरून 84 वर जागा आल्या हे राज्यातील भाजपा नेत्यांना बोलायला जागा शिल्लक ठेवली आहे. स्वप्न मात्र भंगले.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 2, 2021
दरम्यान, या निवडणूक निकालाचे पडसाद महाराष्ट्रात देखील पाहायला मिळत असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचले आहे. चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील 200 +चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या. भाजपचे अनेक महादिग्गज प.बंगाल मध्ये आले,मिथुनदापण आले, सगळे व्यर्थ गेले. 4 वरून 84 वर जागा आल्या हे राज्यातील भाजपा नेत्यांना बोलायला जागा शिल्लक ठेवली आहे. स्वप्न मात्र भंगले.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांबाबत आक्षेपार्ह विधान; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाच जणांविरोधात तक्रार दाखल !
- निवडणूक निकालांपेक्षा लोकांचे जीव वाचणे महत्वाचे : कपिल सिब्बल
- सामन्यानंतर रोहित म्हणाला, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक टी २० सामना’
- ‘पुनावालांच्या आरोपांवर खरं-खोटं तपासण्याची गरज’, जितेंद्र आव्हाडांची मागणी
- औरंगाबादेत सर्व प्रतिबंधात्मक आदेशांना १५ मेपर्यंत मुदतवाढ, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


