कोलकता : आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पद्दुचेरी या विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर होणार आहे. पाच राज्यात जरी निवडणूक असले तरी संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालांकडे लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर आहे. खेला होबे म्हणून ममता बॅनर्जी यांनी भाजपला आव्हान दिले होते.
सुरुवातीच्या कलामध्ये तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसने १९४ जागांवर आगाडी घेतली आहे. तर भाजप ९४ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला मोठा फटका बसतांना दिसत आहे. ते सध्या ५ जागांवर आघाडीवर आहेत. नंदीग्राममध्येही ममता बॅनर्जी आणि शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. दुसऱ्या मतमोजणी अखेर ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. भाजपचे शुभेन्दु अधिकारी आघाडीवर आहेत.
अशात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ट्विट करत बंगालमध्ये भाजपने तीन आकडी संख्या ओलांडली तरी आपण आपले निवडणूक स्ट्रटेजीचे काम सोडून देऊ असे आव्हान दिले होते. तसेच दोन मे निकालाच्या दिवसापर्यंत माझे हे ट्विट जपून ठेवा, असेही ठामपणे सांगितले होते. त्यांचे म्हणणे खरे ठरते की काय, अशी स्थिती आता भाजपवर येत आहे.
प्रचंड ताकदीने भाजप या निवडणुकीत उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे तेथील प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी येथे प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मोदींच्या सभा, शहांचे रोड शो यामुळे भाजपची हवा तयार करण्यात यश आले होते. पण निकाला भाजपच्या मनासारखे अजिबात दिसत नाही.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरिबांच्या लसीकरणाचा खर्च करावा, नाना पटोले यांचे आवाहन
- बेळगावात संजय राऊतांनी प्रचार केलेले शुभम शेळके मोठ्या पिछाडीवर ; भाजपला आघाडी
- राष्ट्रवादीला दणका : ज्या पंढरपूर तालुक्यावर भिस्त, तिथंच भाजपाच्या आवताडेंना आघाडी
- भाजपचा स्वप्नभंग होणार, पश्चिम बंगाल ममता दीदींचेच !
- ‘देश संकटात राजकारणावर काय बोलायचे, कॉंग्रेस नेते आज टीव्हीवर बोलणार नाहीत’


