कोलकता : आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पद्दुचेरी या विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर होणार आहे. पाच राज्यात जरी निवडणूक असले तरी संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालांकडे लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर आहे. खेला होबे म्हणून ममता बॅनर्जी यांनी भाजपला आव्हान दिले होते.
सुरुवातीच्या कलामध्ये तृणमूल काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेसने १९४ जागांवर आगाडी घेतली आहे. तर भाजप ९४ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला मोठा फटका बसतांना दिसत आहे. ते सध्या ५ जागांवर आघाडीवर आहेत. नंदीग्राममध्येही ममता बॅनर्जी आणि शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. दुसऱ्या मतमोजणी अखेर ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. भाजपचे शुभेन्दु अधिकारी आघाडीवर आहेत.
मागील 2016च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे वोट शेअर 44.9 टक्के होता तर भाजपचा 10.2 टक्के होता. काँग्रेस लेफ्ट आघाडीला 37.9 टक्के मते मिळाली होती तर इतरांच्या खात्यात 7 टक्के मते होती. भाजपचा बंगाल मध्ये पराभव होत असला तरीदेखील त्यांचा वोट शेअर नकीच वाढला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘देश संकटात राजकारणावर काय बोलायचे, कॉंग्रेस नेते आज टीव्हीवर बोलणार नाहीत’
- ‘आत्मनिर्भर होण्याचा उद्देश आहे, त्यामुळे देश अडचणीत असताना पंतप्रधान मदतीला येणार नाहीत’
- देशव्यापी लॉकडाऊन लावल्यास कोरोनाची साखळी तुटेल – टास्क फोर्स
- भारतात त्वरित कडक लॉकडाऊन लावा ; टास्क फोर्सचा मोदी सरकारला सल्ला
- प.बंगालमध्ये आम्ही बहुमताचा आकडा पार करु – कैलास विजयवर्गीय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

