बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लागलेल्या या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अवघ्या २६ वर्षांचे शुभम शेळके मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात दहा उमेदवार असले तरी खरी लढत भाजपच्या मंगला अंगडी आणि काँग्रेसचे सतीश जारकी होळी यांच्यात असलेली पाहायला मिळत आहे.
बेळगावातील निकालाचे कल आता हाती येत आहे. भाजपचे उमेदवार मंगला अंगडी यांनी मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी पिछाडीवर आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास मतमोजणी सुरू झाली. टपाली मतांची मोजणीनंतर मुख्य मतमोजणीला सुरुवात झाली. भाजपचे उमेदवार मंगला अंगडी यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली असून ती अजूनही कायम आहे. आतापर्यंत १० लाखांपैकी अडीच लाख मतमोजणी पूर्ण झाली आहे.
मंगला अंगडी यांना १२७६२३ मतं मिळाली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना ११७२८८ मतं मिळाली आहे. मराठी एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके ३२७०३ मतं मिळाली आहे. शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेनेने मागील काही दिवसांपासून जोर लावला असल्याचे पाहायला मिळाले होते. शिवसेनेचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बेळगाव मध्ये जाऊन त्यांच्यासाठी प्रचारसभा देखील घेतल्या होत्या.दुसरीकडे भाजपनेही या ठिकाणी जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत या ठिकाणी पाहण्यास मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीला दणका : ज्या पंढरपूर तालुक्यावर भिस्त, तिथंच भाजपाच्या आवताडेंना आघाडी
- चर्चा काहीही होऊ द्या, ममताच जिंकणार – संजय राऊत
- फक्त ‘या’ दोन राज्यांमध्ये सत्ताबदल होईल; संजय राऊत यांचा ‘पोल’ खरा ठरणार ?
- ‘आत्मनिर्भर होण्याचा उद्देश आहे, त्यामुळे देश अडचणीत असताना पंतप्रधान मदतीला येणार नाहीत’
- ‘देश संकटात राजकारणावर काय बोलायचे, कॉंग्रेस नेते आज टीव्हीवर बोलणार नाहीत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

