कोलकाता : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या नंतर आज पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यावेळी पहिल्या टप्प्यातील ३० जागांसाठी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून ते डझनभर केंद्रीय मंत्र्यांसह मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिल्या टप्प्यासाठी प्रचाराचं रान उठवून दिलं होतं.
पण या रणधुमाळीत काँग्रेसचा आवाज मात्र क्षीण दिसत होता. पहिल्या टप्प्याच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दिसल्या नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काँग्रेसच्या या खेळीमागे भाजपला रोखणं आणि ममता बॅनर्जींना फायदा पोहोचवणं हाच हेतू असल्याचं बोललं जात आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदान आज २७ मार्चला होत असून एकू्ण 77 जागांसाठी होणाऱ्या या मतदानासाठी सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांचा विचार करता शनिवारी एकूण 1.54 कोटीहून जास्त मतदार आपला हक्क बजावतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने या भागात मोठ्या प्रमाणात म्हणजे सुरक्षा दलांच्या जवळपास 684 कंपन्या तैनात केल्या आहेत. यामध्ये एकूण 10,288 मतदान केंद्राच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. या व्यतिरिक्त महत्वाच्या ठिकाणी राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आज पश्चिम बंगाल आणि आसाम मधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जालन्यात शनिवारी सायंकाळपर्यंत तरी लॉकडाऊन नाही : जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे
- पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा, मिटकरींचा सवाल
- भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयच्या आगीत दहा जणांचा मृत्यू
- ‘आव्हाड आणि मलिकांनीच तो अहवाल तयार करून कुंटेंना सही करायला लावली’
- ‘नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

