Share

भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयच्या आगीत दहा जणांचा मृत्यू

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईतील भांडूप मधील ड्रीम्स मॉलमधील सनराईझ या रुग्णालयात काल रात्री बाराच्या सुमारास आग लागली. या मॉलमध्ये सनराईझ रुग्णालय चालवले जात होते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती मॉलमधील रुग्णालयात पसरली.

आग अत्यंत भीषण असल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी ११ तास लागले. आग नियंत्रणात आली असली तरी अधूनमधून आग भडकत असल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. सनराईस रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दहा जणांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला आहे. त्यात दोन कोरोना रुग्णांचा समावेश असल्याची माहिती सध्या मिळत आहे.

या रुग्णालयात ७६ रुग्णांवर उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून रुग्णालयातील ६१ जणांना सुखरूप बाहेर काढलं. आगीत अडकलेल्या चार जणांचा शोध सुरु आहे. या मॉलच्या चारही बाजूला आग पसरल्याने अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत होता. तब्बल ११  तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्यात येणार असून चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!