Share

‘एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही’, संजय राऊतांनी राणेंना डिवचले

Published On: 

मुंबई : राजकीय नाट्यानंतर नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काही विधानंही ऐकवली. यावेळी ते म्हणाले, ‘शिवसेनेने, शिवसेनेच्या नेत्यांनी असे शब्द कधी उच्चारले नाहीत का? १ ऑगस्टच्या बीडीडी चाळीच्या कार्यक्रमाआधी आमच्या पक्षाचे प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाबद्दल वक्तव्य केलं. तोडू वगैरे..आमच्या महिलांवर हात टाकला तर हे करु ते करु वगैरे, हात टाकला तर. त्यावर मुख्यमंत्री महाशय काय म्हणाले? ते असं म्हणाले, सेना भवनाबद्दल अशी कोण भाषा बोलेल त्याचं थोबाड फोडा. हा गुन्हा नाही? तसेच महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही असेही ते म्हणाले.

यावर आज गुरुवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते संजय राऊत भुवनेश्वरचा दौरा अर्धवट टाकून मुंबईत दाखल झाले. त्यांनी विमानतळावरच माध्यमांशी संवाद साधला. राणेंवर टीकार करताना राऊत म्हणाले की, काय करायचं आणि काय नाही हे ठरवणारे ते कोण? आम्ही आणि मोदी पाहून घेऊ काय करायचं ते. कोणीही काहीही विधान करत असेल तर त्यावर बोललंच पाहिजे असं नाही. केवळ एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही. आम्हाला बोलायचंच असेल तर आम्ही नरेंद्र मोदींशी बोलू. अमित शहांशी बोलू. राष्ट्रपतींशी बोलू, असे म्हणत कुणाच्याही विधानावर प्रतिक्रिया दिल्याच पाहिजे असं नाही. आमच्याकडे कामं आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

दरम्यान, काल रात्री माध्यमांशी संवाद साधतानाही राऊत यांनी राणेंवर प्रहार केला होता. ‘राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना असंसदीय भाषेचा वापर करु नये. उद्या उठून कोणी चुकीच्या भाषेचा वापर करत ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानशीलात वाजवेल’ असं म्हटलं तर केंद्र सरकार त्या व्यक्तीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतील,’ असं मत व्यक्त केलं. ‘पंतप्रधानांविरोधात बोलणाऱ्यासाठी जो नियम लावला जातो तोच राणेंना लागू होतो ज्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात अशी भाषा वापरली’ असंही म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!