मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रक्षोभक वक्तव्य करणारे नारायण राणे यांना शिवसेनेने आपला ठाकरी बाणा दाखवला आहे. त्यामुळे भाजपा आणि सेना या दोन्ही पक्षांमध्ये तीव्र संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. त्या अनुशंगाने सध्या मुंबई आणि दिल्लीत घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. भाजपचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच नारायण राणे यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे आता भाजप नारायण राणे यांच्यावरील कारवाईचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नारायण राणेंच्या विधानाशी सहमती दर्शवली नसली तरी भाजपा राणेंच्या पाठीशी उभा राहील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. तसेच राणेंवरील कारवाईविरोधात भाजपानेही तीव्र आंदोलने केली होती. आता अटकेच्या कारवाईमुळे थांबलेली भाजपाची जनआशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू होणार आहे.
जामिनावर सुटल्यानंतर बुधवारी राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी लक्षात ठेवा, तुम्ही माझे काहीही करू शकत नाही. मी तुम्हाला घाबरत नाही. दरवेळी तुम्हाला पुरून उरलो आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी शिवसेनेला डिवचले.
त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी नारायण राणेंना फोन केल्याची माहिती भाजपा नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे. यावेळी अमित शाहांनी नारायण राणेंशी चर्चा करत त्यांच्याकडून पोलिसांनी केलेले कारवाई आणि अटकेच्या कारवाईबाबतचे तपशील याबाबत माहिती घेतली. नारायण राणेंच्या अटकेची थेट केंद्रीय गृहमंत्र्यांनी दखल घेतल्याने आता या प्रकरणात भाजपा पुढे काय करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सलामीवीरांची नाबाद खेळी, पहिल्या दिवसअखेर इंग्लंडकडे ४२ धावांची आघाडी
- बँक कर्मचाऱ्यांना अर्थमंत्री सीतारामन यांचं मोठं गिफ्ट; कुटुंब निवृत्तीवेतनात तब्बल ‘इतकी’ वाढ
- कोरोना काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’-यशोमती ठाकूर
- भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांमध्ये गुंडाळला; ९ खेळाडू दोन आकडी संख्या न गाठताच माघारी
- कोरोना काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’-यशोमती ठाकूर


