मुंबई : नारायण राणे वादग्रस्त वक्तव्य प्रकरणामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेप्रकरणी विनोद तावडे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीचे नेतेही राज्यपालांची भेट घेत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीबाबत ही भेट होण्याची शक्यता आहे. आठ महिने होऊनही राज्यपालांनी आमदारांच्या नियुक्तीवर काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यासाठी राज्य सरकार राज्यपालांची भेट घेणार आहे.
महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकारमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन वाद सुरु आहे. पण हा वाद आता निकाली निघण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याविषयी चर्चेचं निमंत्रण दिले होते. मुंबई हायकोर्टाच्या महत्त्वाच्या निर्णयानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना चर्चेचं निमंत्रण दिल्याची चर्चा आहे.
विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्ती संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चर्चेचं निमंत्रण दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २१ ऑगस्ट रोजी दिली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यापालांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट बैठक बोलावली आहे. बैठकीत याविषयी पुढील रणनीती आखली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि थोरात राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. राज्यापालांनी यावर लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती ते करणार आहेत. या भेटीत नारायण राणे यांच्याविषयीही चर्चा होण्याची शक्यता आहे. दुपारी बारानंतर ही भेट होणार आहे. त्यामुळे या भेटीकडे राज्याचे लक्ष असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीत मोठ्या घडामोडी? नारायण राणेंवरील कारवाईची ‘चाणक्य’ अमित शाह यांच्याकडून दखल
- ‘चाटूगिरीमुळे बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला एवढं का घाबरतायेत’
- रश्मी ठाकरे यांच्या विरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार
- ‘भाजपने आता तरी शहाणे व्हावे’, शिवसेनेचा सल्ला
- ‘ज्याला आपला बाप कोण हेच माहित नाही त्या लावारीस संजय राऊतला काय किंमत द्यायची’, नितेश राणेंची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
