🕒 1 min read
दादरा नगर हवेली : दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी तब्बल ५१ हजार ९ मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणूक निकालामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. या विजयामुळे आता शिवसेनेने महाराष्ट्राच्या बाहेर आता वाटचाल सुरू केली असल्याचं दिसत आहे.
मतमोजनी दरम्यान डेलकर या विजयाच्या जवळ असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा निकाल ऐतिहासिक असणार आहे अशी प्रतिक्रिया दिली. तसेच आमच्या कुटुंबावर, घरांवर, नेत्यांसोबत खेळ तुम्ही सुरु केला आहे त्याचा शेवट आम्हीच करणार असा इशाराही त्यांनी भाजपाला दिला.
दादरा नगर हवेली आणि देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल असे सांगत आहे की, २०२४ साली केंद्रामध्ये परिवर्तन होणार आहे. त्यावेळी आज जे नाचे नाचत आहेत महाराष्ट्रात त्यांच्या पायामध्ये कोणते घुंगरू बांधायाचे आणि त्यांना कसे नाचवायचे हे आम्ही ठरवणार. हे संजय राऊत सांगत आहेत ते लिहून ठेवायचे. आमच्या कुटुंबावर, घरांवर, नेत्यांसोबत खेळ तुम्ही सुरु केला आहे त्याचा शेवट आम्हीच करणार, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- महागडे कपडे आणि वस्तूवरून केलेल्या आरोपांवर समीर वानखेडेंचे मलिकांना प्रत्युत्तर
- मोठी बातमी! एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर
- ‘असे साधुसंत येती घरा, तोची राष्ट्रवादीचा दिवाळी दसरा’; खोतांचा राष्ट्रवादीला टोला
- फटाके फोडा पण धूर काढू नका; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला
- वाचाळांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही; फडणवीस-मलिकांचा वाद शिगेला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
