Share

वाचाळांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही; फडणवीस-मलिकांचा वाद शिगेला

Published On: 

पणजी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्जसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीसांनी देखील नवाब मलिकांना आव्हान दिलं आहे. या सर्व प्रकरणावरुन नवाब मलिक आणि फडणवीसांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता पुन्हा मलिकांवर टीका केली आहे. ते 2 दिवसांसाठी गोवा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे. ‘मी कोणता कलगीतुरा रंगवत नाही. मला जे बोलायचं होतं ते मी काल बोललो आणि जे बोलायचं आहे ते दिवाळीनंतर बोलणार आहे. त्यामुळे वाचाळांना उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही. त्यांच्या जावयाची कोर्टात केस सुरु आहे हे त्यांनीच सांगितलं आहे. मी माफी मागायचा सवालच येत नाही, माफी मागायची वेळ त्यांच्यावरच येईल’, असं म्हणत फडणवीसांनी मलिकांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. जो फोटो त्यांनी ट्विट केला आहे तो चार वर्षांपूर्वीचा आहे. रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. मी त्यांना मदत करत होतो. जयदीप राणा हा भाड्यानं आणलेला माणूस आहे, असं रिव्हर मार्चने स्पष्ट केलंय. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. मलिकांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडलाय, मी दिवाळीनंतर बाँब फोडणार,’ असे वक्तव्य केले होतं. आता फडणवीस दिवाळीनंतर नेमकं काय बोलणार आणि त्याचा महाविकास आघाडीला काय धक्का बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!