मुंबई : मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यामधला वाद संपण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. उलट दिवसेंदिवस तो वाद वाढतच आहे. नवाब मलिक यांच्याकडून सातत्यान नवनवे आरोप केले जात असताना समीर वानखेडे यांच्याकडूनही त्यावर प्रतिक्रिया देत आरोप फेटाळले जात आहेत.
नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. समीर वानखेडे रोज नवनवे कपडे वापरतात व महागड्या वस्तू वापरतात, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. यावर ‘माझ्या महागड्या कपड्यांबाबत ही केवळ अफवा आहे. मलिकांना कमी ज्ञान असून त्यांनी आणखी माहिती घ्यावी’, असे समीर वानखेडे म्हणाले.
‘एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा शर्ट हजार-पाचशेपेक्षा महागडा नाही, पण समीर वानखेडेचा शर्ट ७० हजार रुपयांचा का असतो? प्रत्येक दिवशी नवे कपडे घालतात. मोदींच्याही पुढे गेलेत. पँट लाख रुपयांची, पट्टा २ लाखाचा, बुट अडीच लाखाचे, घड्याळ ५०, ३०, २५ लाख रुपयांचं. मी याचे सर्व फोटो तुम्हाला देईल. या सर्व काळात त्यांनी जशाप्रकारचे कपडे घातलेत त्याची किंमतच ५-१० कोटी रुपये आहे’, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यावर समीर वानखेडे म्हणाले की, ‘माझ्या महागड्या कपड्यांचं म्हणाल, तर ही फक्त एक अफवा आहे. नवाब मलिक यांना याविषयी फार कमी माहिती आहे. त्यांनी याविषयी खरी माहिती शोधून काढायला हवी’, असं प्रत्युत्तर त्यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? मलिकांचा सोमय्यांना सवाल
- रामदेव बाबा यांची गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची केंद्र सरकारकडे मागणी
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
- भाऊबीजेला भेट म्हणून अजित पवारांकडे सिलेंडर मागणार- सुप्रिया सुळे
- मी ६२ वर्षांपासून मुंबईत राहतोय, .. हिंमत कोणीही केली नाही-नवाब मलिक

