मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आज मंगळवारी ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या. यावेळी त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील जमीन घोटाळ्यासंबंधी चौकशी केली. मंदाकिनी खडसे यांचे वकील मोहन टेकवडे यांनी सांगितले की, पुण्यातील कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी मंदाकिनी या पूर्ण सहकार्य करत आहेत. त्यानूसारच त्या आज ईडी कार्यालयात दाखल झाल्या.
पुणे येथील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे. याच प्रकरणात एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे यांच्यावरही ईडीकडून आरोप ठेवण्यात आलेले आहेत.
Mumbai | Nationalist Congress Party (NCP) leader Eknath Khadse's wife Mandakini Khadse appeared before the Enforcement Directorate for cooperating in the investigation in a case related to an alleged land scam in Pune, said her lawyer Mohan Tekavde pic.twitter.com/IZGJnE7QwI
— ANI (@ANI) November 2, 2021
दरम्यान, मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यांना अधीही अटक केलं जाण्याची शक्यता होती. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर न्यायालयात १४ ऑक्टोंबर रोजी सुनावणी घेण्यात आली. यामध्ये मंदाकिनी खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. तसेच या कालावधीत त्यांनी ईडीला तपासकार्यात सहकार्य करावे असे निर्देश कोर्टाने दिले.
तर २५ ऑक्टोंबर रोजी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पुणे येथील भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसे हे आरोपी आहेत. याच प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे.
काय आहे भोसरी जमीन घोटाळा?
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? मलिकांचा सोमय्यांना सवाल
- रामदेव बाबा यांची गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची केंद्र सरकारकडे मागणी
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
- भाऊबीजेला भेट म्हणून अजित पवारांकडे सिलेंडर मागणार- सुप्रिया सुळे
- मी ६२ वर्षांपासून मुंबईत राहतोय, .. हिंमत कोणीही केली नाही-नवाब मलिक

