Share

‘असे साधुसंत येती घरा, तोची राष्ट्रवादीचा दिवाळी दसरा’; खोतांचा राष्ट्रवादीला टोला

Published On: 

मुंबई : नवाब मलिक राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पत्रकार परिषद घेत आहेत. आता त्यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. अमृता फडणवीस यांचा जयदीप राणासोबतच फोटो ट्वीट करत मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केले. यानंतर आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार व फरार आरोपी विजय मल्ल्या यांचा फोटो ट्विट करत नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधलाय.

सदाभाऊ खोत यांनी शरद पवार व फरार आरोपी विजय मल्ल्या यांचा फोटो ट्विट केले आहे. “नवाब मिया पवार साहेबांच्या बरोबर कोण हे साधुसंत?, असे साधुसंत येती घरा तोची राष्ट्रवादीचा दिवाळी दसरा”, असा खोचक टोला खोत यांनी लगावला आहे. यामुळे सध्या अनेक प्रश्न निर्माण होत आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांच्या आरोपानंतर फडणवीस उत्तर देत म्हणाले, नवाब मलिक यांनी लवंगी फटाके लावून मोठा आवाज करण्याचा प्रयत्न केलाय, नवाब मलिक यांनी जो फोटो ट्विट केला आहे त्यासंदर्भात कालच रिव्हरमार्चच्या टीमनं त्यासंदर्भात स्पष्ट केलं आहे. तो व्यक्ती त्या संघटनेने हायर केलेला होता. रिव्हरमार्च ही संघटना नदी पुनरुज्जीवन करण्याचं काम करते. त्यावेळी मी आणि अमृता फडणवीस यांनी त्या व्यक्तीसोबत फोटो काढला होता. मात्र, जाणीवपूर्वक नवाब मलिकांनी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला.

नवाब मलिक यांनी सुरुवात केलीय तर मला आता हे प्रकरण अंतापर्यंत न्यावं लागेल. नवाब मलिक एनसीबीवर दबाव आणण्यासाठी हे काम करत आहेत. नवाब मलिकांनी जे आरोप केलेत हास्यास्पद आहेत. नवाब मलिकांच्या जावयाला एनसीबीनं ड्रग्जसह अटक केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न नवाब मलिकांकडून केला जात आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!