🕒 1 min read
औरंगाबाद : मे महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. तरी देखील नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. शहरात लसीकरण, लॉकडाऊन आणि नागरिकांच्या स्वयंशिस्तीमुळे दुसरी लाट रोखण्यात यश मिळत आहे, असा दावा पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी (दि.१०) केला. शहरात कोरोना आटोक्यात येत असताना दिसत असला तरीही नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टंसिंग, सॅनेटाईझर या त्रिसूत्रीचा वापर करावा. लॉकडाऊन उघडल्यानंतरही नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली तरच दुसरी लाट थोपविण्यात यश मिळाल्याचे म्हणता येईल, असेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले.
शहरात १५ फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. या महिन्याच्या तिसर्या आठवड्यातच उद्रेक झाला. घराघरात संसर्गाचे रुग्ण आढळून येत असल्याने दररोजचा आकडा आठशे ते हजारच्या घरात गेला होता. त्यामुळे पालिकेने तातडीने उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे. कोविड केअर सेंटरसह सरकारी व खासगी रुग्णालयात बेड्सची समस्या निर्माण झाली होती. बाधित रुग्णांवर उपचारासाठी भंटकती करण्याची वेळ आली. मार्च महिन्यात तब्बल जिल्हयात ३२ हजार ३१२ रुग्ण तर एप्रिल महिन्यात ४१ हजार रुग्ण आढळून आले.
मात्र प्रशासनाने उपचाराचे योग्य नियोजन आणि चाचण्या वाढवून लसीकरणावर लक्ष केंद्रीत केले. त्याचा परिणाम रुग्ण बरे होऊन घरी परतण्यास सुरूवात झाली. एप्रिलच्या शेवटच्या आठवडयापासून रुग्ण संख्या कमी होण्यास सुरूवात झाली. आता मे महिन्यात बाधित रुग्णांची संख्या तिनशे ते चारशे दरम्यान आढळून येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला. लॉकडाऊन, लसीकरण आणि नागरिकांच्या स्वयंशिस्तीमुळेचे कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात यश मिळत असल्याचे आयुक्त पांडेय यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा समाजाला समजलंय त्यांची लढाई राज्य सरकारविरोधात नाही – उद्धव ठाकरे
- म्युकोरमायकोसीसचा धोका वाढतोय, मनपाने तातडीने उपाययोजना कराव्यात- माजी उपमहापौर
- अभिनेत्री श्रृती हसनला घराचे हफ्ते भरण्याची सतावते चिंता
- कोरोना मृत्यूचं पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच नाही का ? – आशिष शेलार
- नेहा आणि रोहनप्रीत मारामारी करत असल्याचा व्हीडिओ समोर; काय आहे नेमकं कारण ?


