मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजना राबवत आहे. राज्यात लॉकडाऊन करण्यात आला असून आता जिल्हा पातळीवर पूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोना स्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरत असल्याची टीका भाजप नेते करत आहेत. भाजप नेत्यांच्या या टीकेला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून आज प्रत्युत्तर देण्यात आलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
या कौतुकावर भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘आजच्या सामना अग्रलेखाला खाली डोकं वर पाय असं म्हणावं लागेल. महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे सर्वात जास्त का आहे? मृत्यूची संख्या सर्वात जास्त का आहे? मग याच पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घ्यायचं नाही का?,’ असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अभिनेता सलमान खानच्या दोन्ही बहिणींना कोरोनाची लागण
- “देश चालविणे जमत नसेल तर राजीनामा द्या, सोनू सूदला किंवा सलमान खानला पंतप्रधान बनवा”
- कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी जमली तुफान गर्दी
- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी
- पैसे दिलेच नाही तर ED कशाला? अनिल देशमुखांवरील कारवाईवरून काँग्रेसचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

