🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूडमधील अभिनेता-अभिनेत्री यांना कधी आर्थिक संकटाचा सामना करावा लागला नसेल असे एकंदरीत अनेकांना वाटत असते. मात्र कोरोनाच्या या संकटामध्ये अगदी सामान्य माणसापासून ते अनेक उद्योजकांना याचा फटका बसला आहे. यात मनोरंजन क्षेत्र देखील सुटले नाही. मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटींना देखील लॉकडाऊनचा चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. अभिनेत्री श्रृती हसनची देखील आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याचे समजत समजत आहे.
अभिनेत्री श्रृती हसन ही प्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांची मुलगी आहे. श्रृती चित्रपटात काम करण्यासाठी भरपूर मानधन घेते. मॉडेलिंग आणि सिनेमा यातून ती भरपूर रक्कम कमवते. यातून ती आपला उदरनिर्वाह चालवते. मात्र सध्या शूटिंग बंद तिला देखील याचा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनामुळे तिलाही प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाचे संकट असले तरी शूटिंग करण्यासाठी ती तयार असल्याचे तिने म्हटले आहे.
‘लॉकडाऊनमुळे काम नसल्याने आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे तिने म्हटले आहे. अशात घराचा हफ्ते तरी कसे भरायचे याची चिंता सध्या तिला सतावत आहे. माझी मदत करण्यासाठी माझे आई-वडिलही माझ्याजवळ नाहीत. शूटिंग सेटवर विना मास्क राहणे खरंच खूप भीतीदायक असले, तरीही मला पुन्हा एकदा कामाला सुरुवात करायची आहे. माझ्यासारखे कित्येकांना आज पैश्यांची गरज आहे. अनेक कुटंबाचा उरदर्निवाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.’ असे तिने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
पुढे ती म्हणते की, “या महामारीच्या काळात काही लोकांनी घर किंवा कार विकत घेतलं नाही. पण मी घर विकत घेतलं आणि सर्व समस्या सुरू झाल्या. त्यामुळे आता मला त्याचे हफ्ते भरण्यासाठी काम करावंच लागेल”, असं तिने स्पष्ट केलं आहे. अनेकांची या कोरोना काळात हतबल स्थिति झाली आहे. श्रुती सारखीच आता अनेकांची अशी स्थिति झाली असल्याचे चित्र दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणीसोबत गँगरेप; कोरोनामुळे झाला दुर्दैवी मृत्यू
- दु:खद! मेजर ध्यानचंद यांचे पुत्र बृजमोहन यांचे निधन, महिन्याभरापुर्वीच झाले होते कोरोनामुक्त
- नवाब मलिक जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील, दरेकरांचा टोला
- एबी डिव्हीलीयर्स नंतर ‘हा’ दिग्गज खेळाडूही टी-२० विश्वचषकात करु शकतो पुनरागमन
- ‘नद्यांमध्ये वाहणारे असंख्य मृतदेह, मोदीजी तो गुलाबी चष्मा आतातरी काढा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

