मुंबई : प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड़चे अनेक गाणी सुपरहिट झाली आहेत. त्याच्या आवाज तरुणाई मध्ये प्रचंड आवडीचा ठरला आहे. मागीलवर्षी ऑक्टोबर मध्ये नेहाने रोहनप्रीत सिंह सोबत विवाह केला. यांची जोडीची चर्चा होत राहिली आहे. आता पुन्हा एकदा अशीच काहशी चर्चा यांच्या बाबतीत सुरू झाली आहे. नेहाने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला. नेहा आणि रोहनप्रीत यांच्या भांडण झाले असून वादाचे रुपांतर मारहाणीत झाले आहे. या मारहाणीचा व्हिडिओ नेहा कक्कड़ने सोशल मिडियावर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/COuMW_VDFX5/?utm_source=ig_web_copy_link
हा व्हिडिओ नेहाने का शेअर केल्यामुळे अनेकणा हे असे का करत आहेत असा प्रश्न पडला आहे. या व्हिडिओच्या खाली नेहा कक्कड़ने #KhadTainuMainDassa असे हॅशटॅग वापरले आहे. मात्र या हॅशटॅगमागे तुम्हाला याचे उत्तर मिळेल. तिचा आणि रोहनप्रीतचा लवकरच एक नवा अल्बम येणार आहे. त्या अल्बमच्या प्रोमोशनसाठी नेहाने रोहनप्रीतसह हा मजेशीर फायटिंग करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
याआधी नेहा आणि रोहनप्रीतचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात ती गरोदर दिसत होती. लग्नाच्या काही महिन्यांतच हा फोटो समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र त्यानंतर नेहाच्या ‘ख्याल’ या अल्बममधील हा फोटो असल्याचे समोर आले होते. नेहा नेहमीच अल्बम येण्याअगोदर प्रेक्षकांना कोड्यात टाकून ठेवत असते. आता देखील अशीच काहीशी तिने मजा केल्यामुळे हे नेमके मारामारी का करत आहेत याचे उत्तर नेहाचा हा अल्बम रिलीज झाल्यानंतरच कळेल.
महत्वाच्या बातम्या
- इच्छाशक्ती समोर कोरोनाही झुकतो; डॉक्टरांनीही आशा सोडलेल्या ९३ वर्षीय आजोबांनी जिंकून दाखवलं !
- दु:खद! मेजर ध्यानचंद यांचे पुत्र बृजमोहन यांचे निधन, महिन्याभरापुर्वीच झाले होते कोरोनामुक्त
- नवाब मलिक जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील, दरेकरांचा टोला
- एबी डिव्हीलीयर्स नंतर ‘हा’ दिग्गज खेळाडूही टी-२० विश्वचषकात करु शकतो पुनरागमन
- …तर ३ आठवड्यात मुंबईकरांचे लसीकरण करू ; आदित्य ठाकरेंचा दावा


