पुणे : पुण्यातील भाजपाच्या एका कार्यक्रमात मंगळवारी सायंकाळी गुंडांच्या सौभाग्यवतींनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या सौभाग्यवतींनी मोठे शक्तीप्रदर्शन करत चंद्रकांत पाटलांचा यावेळी सत्कारही केला. यामुळे पुण्यात एकच गदारोळ झाला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाचे पास नव्हते, हा कार्यक्रम सर्वांसाठी खूला होता, असे स्पष्टीकरण दिले आहे. यावरुन मात्र विरोधकांनी चंद्रकांत पाटील व भाजपावर निशाना साधला आहे.
पुणे महानगर पालिका निवडणूक येत्या एक ते दोन महिन्यांत होणार आहे, त्यामुळे पुणे सध्या राजकीय आखाडा बनल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार व शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत एक मोठा कार्यक्रम झाला. यावेळी गुंडांच्या सौभाग्यवतींनी चंद्रकांत पाटलांचा जंगी सत्कार केला. या प्रकरणामुळे पुण्यात मोठा गदारोळ झाला, यावेळी चंद्रकांत पाटलांनी सारवासारव करत हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खूला होता, पासेस वैगरे नव्हते, असे म्हणत हात झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी याच मुद्द्यावरुन भाजपला धारेवर धरले आहे.
मृत शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ तसेच संदीप मोहोळच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या संतोष लांडेची पत्नी गायत्री लांडे यांनीही जोरदार शक्तीप्रदर्शन करत चंद्रकांत पाटलांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला भाजपचे पुण्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी हजर होते. कार्यक्रमानंतर याबाबत बातम्या येताच चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण दिले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता. आम्ही कुणालाही पास दिलेले नव्हते. त्यांनी शक्तिप्रदर्शन का केलं हे त्यांना विचारा. या सौभाग्यवती भाजपात प्रवेश करणार आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सध्या पक्षात प्रवेश देण्यासाठी कोअर कमिटी आहे. ती निर्णय घेईल. आत्ता त्यांना प्रवेश देण्याबाबत कुठलाही निर्णय नाही. केवळ कोथरूडच्या आमदारांच्या चांगल्या कामाच्या कौतुकासाठी त्या आल्या होत्या, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटीलांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात सबळ पुरावे; राज्य सरकारची कोर्टासमोर माहिती
- ‘मोठे लोकही फाटलेले कपडे घालतात का..’म्हणणाऱ्या नेटकऱ्यांकडून जॅकलिन झाली ट्रोल
- आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांकडूनही सुधारित तिकिटाच्या रक्कमेची आकारणी केली जाणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
