Share

या कारणामुळे ठेकेदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Published On: 

औरंगाबाद: एचयूडीएस अंतर्गत दुर्गम भागात रोहित्र बसवून वीज जोडणी देण्याचे काम करण्यात आले आहे. पण हे सर्व काम बोगस, निकृष्ट दर्जाचे झाले असून रोहित्रात वारंवार बिघाड होऊन पिकाला पाणी देता न आल्याने हंगाम वाया गेला. याची चौकशी करून दोषी ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि नुकसान भरपाई द्या, अशी मागणी करत फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून महावितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

गुजरातची कंपनी ही कामे करून निघून गेली. कन्नड, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव तालुक्यांतील ३० टक्क्यांपर्यंत रोहित्रे बंद पडली आहेत. निकृष्ट दर्जाचे रोहित्र व कामही निकृष्ट पद्धतीने करण्यात आल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. कंपनीने पाच वर्षे देखभाल दुरुस्तीची हमी घेतलेली आहे. पण दाद कुणाकडे मागावी? कंपनीचे महाराष्ट्रात कुठे कार्यालय व मनुष्यबळ नाही. महावितरणकडे तक्रार करून काहीच उपयोग होत नाही. फेल पडलेले रोहित्र वेळेवर कुणीच दुरुस्त करून देत नाही. त्यामुळे पाणी असून विजेविना संपूर्ण हंगाम वाया गेला. रब्बीचे पीक पाण्यावाचून गेले.

यास जबाबदार कंपनी आणि महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करावी व झालेली नुकसानभरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी सुनील सोनवणे, फसवणूक झालेले शेतकरी धोंडिराम तुपे, कारभारी मगर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. मगर यांचे रोहित्र ८ महिन्यांपासून, तर सुमनबाई तुपे यांचे रोहित्र ४ महिन्यांपासून बंद पडले आहे. वैजापूर येथील बाभुळगावचे शेतकरयाचा आदाेलनात सहभाग हाेता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!