Share

ममता बॅनर्जींना धक्के पे धक्का, आमदार सोनाली गुहा भाजपमध्ये

Published On: 

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकांपूर्वी एकाच दिवशी भाजपने जोरदार झटके दिले आहेत. तृणमुलचे राज्यसभा खासदार आणि ममतांचे जवळचे मानले जाणाऱ्या दिनेश त्रिवेदींनी शनिवारी भाजपत प्रवेश केला. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची उपस्थिती होती.

काँग्रेसहून भाजप जाणाऱ्या आमदारांचे नाव या यादीत सामाविष्ट केले जाऊ शकते. दक्षिण २४ परगाणतील सतगछिया जागेवर आमदार सोनाली गुहा यांनी भाजपत जाण्याचे संकेत दिले आहेत. त्या ममता दिदींच्या नजीक मानल्या जातात. त्या चार वेळा आमदार निवडून आल्या आहेत. यंदा त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते.

दक्षिण २४ परगनामधील सतगछिया येथून तृणमूल काँग्रेसच्या आमदार सोनाली गुहा तिकीट न मिळाल्याने नाराज झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच त्या भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

‘ममता दीदी मला सोडू शकतात तर मी का नाही? मी मुकुल रॉय यांच्याशी बोलले आहे की, मी निवडणूक लढणार नाही पण मला एक सन्माननीय पद हवं आहे. गुहा यांनी सांगितले की रॉय यांनी आपली मागणी मान्य आहे. मी नक्कीच भाजपमध्ये प्रवेश करेन’ असं सोनाली गुहा यांनी म्हटलं आहे. सोनाली गुहा या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या सर्वात जवळच्या सहकारी होत्या. मात्र तृणमूल काँग्रेसकडून यंदा गुहा यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. तृणमूलकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर सोनाली गुहा यांना माध्यमांशी बोलताना रडू कोसळलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!