🕒 1 min read
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे राज्यभरात कोरोना नियम कडक करण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना पुन्हा एकदा वाढत असताना अजूनही अनेकजण विना मास्कचे फिरत आहेत. अशा लोकांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे.
असे असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सार्वजनिक ठिकाणी देखील मास्क वापरत नसल्याचे दिसले आहे. यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी हाथ जोडून राज ठाकरे यांना मास्क घालण्याची विनंती केली. त्याचबरोबर पुढे किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘आपण हजारो लोकांचे आयडॉल आहात. अनेक लोक आपल्याकडे बघून प्रभावित होतात. महाराष्ट्राला तुमची गरज आहे.
त्यामुळे आपण सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना कृपया मास्कचा वापर करावा. आपण मास्क घालत नसल्यामुळे अनेक जण या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाहीत. असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंकडे मास्क घालण्याची विनंती केली.
आपल्या घरातही वयोवृद्ध मंडळी आहेत. या गोष्टी विचारात घेऊन आपण सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना मास्क घालावा, ही हात जोडून विनंती आहे,’ असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे आणि बहीण जयजयवंती देशपांडे यांनी दोनच दिवसांपूर्वी कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या देखील उपस्थित होत्या.
महत्वाच्या बातम्या
- टीव्हीएस कंपनीकडून ‘हे’ प्रसिद्ध दुचाकी मॉडेल लाँच
- विराट अनुष्काचा सोशलवर रोमँटिक अंदाज
- पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला परवानगी !
- ‘मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा’
- मोठी बातमी : पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र ‘हे’ कडक निर्बंध लागू होणार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
