Share

हवामान खात्याचा इशारा! आजपासून ४ जूनपर्यंत अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

Published On: 

मुंबई :  भारतातील अनेक राज्यांमध्ये तीन दिवसांपूर्वीच मान्सूनचे आगमन झाले आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन लवकरच झाले आहे. यामुळे उष्णतेने व्याकुळ झालेली जनता आता निवांत झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाला महारष्ट्रात देखील सुरवात झालेली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येणाऱ्या काही दिवसांत बिहार, झारखंड आणि छत्तीसगडमध्येही मान्सूनच्या सरी बरसतील.

मान्सूनचे आगमन जरी लवकर झाले असले तरी यामुळे भरपूर नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वादळ यामुळे अनेक ठिकाणी नुकसानकारक घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात दोन दिवसांपूर्वी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज उत्तर पूर्व आणि दिल्लीच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर 2 जून ते 4 जून या कालावधीमध्ये मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मान्सूनच्या आगमनामुळे अनेक राज्यात वातावरण ढगाळ राहील. हवामान खात्याच्या अंदाजानुसार श्रीनगर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, जयपूर, शिमला, मुंबई, लखनौ, गाझियाबाद, लेह आणि पाटणा येथे किमान तापमान 24 अंश सेल्सिअस ते 42 अंश सेल्सिअस एवढे राहील. याचबरोबर अनेक राज्यांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान हवामान खात्याने वर्तवली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!