Share

गायक केके यांचे अकाली निधन! क्रिकेट विश्वातून व्हीव्हीएस लक्ष्मणसह ‘या’ दिग्गजांनी केला शोक व्यक्त

Published On: 

मुंबई : प्रसिद्ध गायक केके यांनी मंगळवारी रात्री या जगाचा निरोप घेतला. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. तो कोलकात्यात लाइव्ह शो करत होता. शो संपल्यानंतर त्याची तब्येत अचानक बिघडली आणि तो हॉटेलवर गेला. तसा तो कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. कोलकाता मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट येथे नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रसिद्ध गायकाच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ही बातमी रात्री उशिरा समोर येताच ज्या कोणी ऐकली तो स्तब्ध झाला. बॉलीवूडपासून ते त्यांच्या प्रियजनांपर्यंत सर्वजण त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. केके यांच्या निधनामुळे केवळ बॉलिवूडच नाही तर क्रिकेट विश्वालाही धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर माजी भारतीय खेळाडूंनीही यावर शोक व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

केके यांच्या निधनावर क्रिकेट जगताने शोक व्यक्त केला

भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने लिहिले, “महान गायक केके यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. ते त्यांच्या संगीताद्वारे नेहमीच आमच्यासोबत असतील. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती माझ्या संवेदना.”

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने लिहिले, “केकेच्या मृत्यूची बातमी ऐकून खूप दुःख झाले. यावरून आयुष्य किती अनिश्चित आहे हे दिसून येते. त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती माझ्या संवेदना.”

 

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सुरेश रैनाने लिहिले, “मला खूप मोठा धक्का बसला आहे. हे आमच्यासाठी खूप मोठे नुकसान आहे. तुमची गाणी नेहमीच आमच्या हृदयात राहतील. तुम्ही एक दिग्गज आहात. केके तुम्ही खूप लवकर गेला आहात. तुमच्या प्रियजनांना हे नुकसान सहन करण्याची ताकद मिळो.”

शिखर धवननेही केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!