मुंबई : करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली. धनंजय मुंडेंचे इतरही अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा खुलासा करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. राज्यात शक्ती कायदा मंजूर झाला आहे, पण धनंजय मुंडे हे मंत्री पदाचा गैरवापर करत असून खोट्या या तक्रारी करून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील गंभीर आरोप केला आहे.
“माझ्या पतीचे (धनंजय मुंडे) नऊ नंबर आहेत एका वाईट काम करणाऱ्या महिलेचे देखील ऐवढे नंबर नसतात. त्यांनी अनेक मुलींना फसवले आहे. मी पुरावे देऊ शकते अशा तीन मुली आहेत. माझ्या आणि राजश्री मुंडे यांच्या व्यतिरिक्त माझी बहीण सोडून तीन मुली आणखी आहेत. ज्यांना धनंजय मुंडेनी फसवलं आहे. माझे पती धनंजय मुंडे मला ब्लॅकमेलर म्हणतात. मात्र मी आणि माझा परिवार ब्लॅकमेलर नसून त्यांनी तिकडची पत्नी राजश्री धनंजय मुंडे ब्लॅकमेलर आहेत. कारण १ हजार करोडची मालमत्ता त्यांच्या नावावर आहे. त्यामुळे त्या ब्लॅकमेलर आहेत,” असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे.
धनंजय मुंडेंना लाथ मारुन मंत्री पदावरुन हटवले पाहिजे-
करुणा मुंडे म्हणाल्या, “धनंजय मुंडे आणि माझ्या बहीनीचे शारीरीत सबंध होते, हे जेव्हा मला कळाले तेव्हा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ५ दिवस मी हॉस्पिटलमध्ये दाखल होते. हे सर्व प्रकरण जेव्हा माझ्या आईने देखील धनंजय मुंडेंच्या दबावाखाली आत्महत्या केली. धनंजय मुंडेनी माझ्या भावाला देखील मानसिक त्रास दिला. धनंजय मुंडे आपल्या मंत्रीपदाचा सर्वात जास्त दुरुपयोग करत आहेत. या राज्यात शक्ति कायदा असेल तर शरद पवारांनी धनंजय मुंडेंना लाथ मारुन मंत्री पदावरुन हटवले पाहिजे.”
धनंजय मुंडे ४ महिलांवर अत्याचार करत आहेत-
“धनंजय मुंडे ४ महिलांवर अत्याचार करत आहेत. माझी बहीण रेणू शर्मा प्रकरणाव्दारे सेक्स रॅकेट प्रकरणातील मुलींना धनंजय मुंडे घाबरवत आहे. त्यांच्यावर दबाव निर्माण करत आहे. नवऱ्याच्या नावाचे मी पाणी आणि पिंडदान सोडले. असा अय्याश आणि औरतबाज नवरा मला नको. आपल्या सेक्सच्या जाळ्यात अडकवून धनंजय मुंडेनी माझ्या बहिणीला ४० वर्षाचे केले. कोणत्या तोंडाने हे शिवाजी महाराजांचे नाव घेत असतील,” असे करुणा मुंडे म्हणल्या.
करुणा मुंडे म्हणल्या, “सुप्रिया सुळे काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या महिलांवर अत्याचार करणाऱ्याचे हात तोडू, माझी बहिण आठ ते नऊ महिन्यांपासून त्यांना मेसेज करत आहे. पण कोणताही प्रतिसाद येत नाही आहे. त्यांना विनंती त्यांनी धनंजय मुंडेना मंत्रीपदावरुन हटवावे.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

