Share

“धनंजय मुंडे भूमाफिया असून लोकांच्या जमिनी लाटल्या”, करुणा मुंडेंचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे नेहमीच काहीतरी खुलासा करत खळबळ माजवून देत असतात. त्यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे भूमाफिया असून त्यांनी लोकांच्या जमिनी लाटल्या असल्याचे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.

लवकरच मी धनंजय मुंडे यांचे भूमाफिया रॅकेट बाहेर काढणार आहे. १९९८ मध्ये मृत पावलेल्या व्यक्तीने २०१० साली धनंजय मुंडे यांच्या नावावर जमीन केली, असल्याचा दाखला करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिला. यासंबंधी वृत्तपत्रातील पुरावाही त्यांनी माध्यमांसमोर सादर केला. या व्यतिरिक्त त्यांनी अजूनही अनेक आरोप केले आहेत.

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/5210331952381061

…तर पूर्ण महाराष्ट्र हादरेल

धनंजय मुंडेंचे इतरही अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा खुलासा करुणा मुंडे यांनी केला आहे. तसंच माझ्याकडे एक सीडी आहे आणि आपण जर सीडी काढली तर, पूर्ण महाराष्ट्र हादरेल. असं खळबळजनक वक्तव्यही त्यांनी केलं आहे. आपली मुलगी शिवानी धनंजय मुंडे हीच पत्रकार परिषद घेणार होती, मात्र ती अनुपस्थित असल्याने आपण पत्रकार परिषद घेत आहोत असं त्यांनी सांगितलं. शिवानी ही धनंजय मुंडेंच्या विरोधात मोठा गौप्यस्फोट कऱणार होती, पण आपल्या मुलीला धमकावण्यात आल्याने ती पत्रकार परिषदेला गैरहजर राहिल्याचा आरोपही करुणा मुंडे यांनी केला आहे. मुंडेंच्या सांगण्यावरुन मी माझ्या बहिणीला घराबाहेर काढलं, पण त्यांनी माझ्या बहिणीच्या मोबाईलवर मेसेज केले. त्यानंतर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असंही करुणा मुंडे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!