Share

हिजाब परिधान करणं ही वैयक्तिक बाब परंतु… तृप्ती देसाई यांची प्रतिक्रीया

Published On: 

सांगली : गेले अनेक दिवस देशभरात हिजाब परिधान करून शिक्षण संस्थेत जाण्यावरून वाद सुरु आहेत. त्याला अनेक प्रतिक्रिया पण उमटल्या आहेत. कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यात काही मुलींनी धार्मिक पेहराव घालून शाळेत प्रवेश करायचा प्रयत्न केला होता. परंतु तिथल्या प्राचार्यांनी शाळेत यायचं असेल तर धार्मिक पेहराव न घालता आणि शाळेचा ठरलेला गणवेश घालूनच यावं लागेल अशी अट घातली  होती.

यावर देशभरात अनेक ठिकाणी प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेक ठिकाणी आंदोलन पण झाली. यावरच भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. हिजाब वादावर प्रतिक्रिया देताना तृप्ती देसाई म्हणाल्या कि , ”  हिजाब वरून जे हिंदू मुस्लिम वातावरण तापले आहे  ते अत्यंत चुकीचे आहे. खरं तर शाळेत जाताना शाळेचा गणवेश परिधान करणे हेच योग्य आहे. उद्या कोणीही ही उठून काहीही करेल. ज्याला त्याला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. परंतु शैक्षणीक संस्थेत शिक्षण घेत असाल तर त्या शैक्षणिक संस्थने ठरवलेला गणवेशच परिधान करायला हवा अशी ठाम भूमिका आज भूमाता बिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी घेतली आहे. आज सांगलीत त्या एका कार्यक्रमात बोलत होत्या त्यावेळी त्यांनी हिजाब वादावर ठाम भूमिका घेत प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान शैक्षणिक संस्थेत हिजाब घालायला परवानगी द्यावी अशी याचिका करणाऱ्या लोकांना कर्नाटक उच्च न्यायालयाने झटका दिला असून आमचा हिजाब प्रकरणी अंतिम निर्णय येई पर्यंत राज्यात कोणीही धार्मिक पेहराव घालून कोणत्याही शिक्षण संस्थेत प्रवेश करून नये असा आदेश दिला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था त्वरित सुरु करण्याचे आदेश दिले आहेत; त्यामुळे ‘हिजाब वादावर ‘ पडदा पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!