🕒 1 min read
पणजी: आज १४ फेब्रुवारी रोजी गोवा राज्याच्या विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. आज सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत गोवा राज्यात विक्रमी ७५ टक्के मतदान झाले. या विक्रमी मतदानामुळे सर्वच पक्षांचे धाबे दणाणले आहे. गोवा राज्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष , काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या तीन पक्षातच मुख्य लढत होणार आहे. निवडणुकांचे सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांनुसार जेव्हा कुठल्याही निवडणुकीसाठी विक्रमी मतदान होते तेव्हा सत्ताधारी पक्षाला त्याचा फटका बसण्याची शक्यता जास्त असते.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण ३०१ उमेदवार आपले भविष्य आजमावत होते. या विक्रमी ७५ टक्के मतदानामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमालीचे धास्तीचे वातावरण आहे. गोवा विधानसभेसाठी विक्रमी ७५ टक्के मतदान झाले असले तरी या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला एकहाती सत्ता मिळणार नाही असे भाकीत अनेक राजकीय पंडितांनी वर्तविले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मुलाने उत्प्प्ल पर्रीकर पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांना टीकेला सामोरे जावे लागले आहे.
महाराष्ट्र गोमंतक पक्ष, तृणमूल काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष गोवा विधानसभेच्या निवडणूकीत उतरले असले तरी या पक्षांना या निडणूकीत यश मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. गोव्यासह, पंजाब, उत्तरप्रदेश, मणिपूर आणि उत्तराखण्ड या राज्यांच्या विधानसभेसाठी झालेल्या आणि होणाऱ्या निवडणुकांचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “ग्रामपंचायत भाजपची, सोसायटी भाजपची तरी…”; दरेकरांपुढे शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
- साडेतीन लोकांना अटक करा किंवा कोणालाही अटक करा ; परंतु माझ्या प्रश्नांची उत्तरे आधी द्या :- किरीट सोमय्या
- ‘कर नाही त्याला डर कशाला’; भातखळकरांचा संजय राऊतांना टोला
- ‘कोणाच्या घराबाहेर आंदोलन करणं चुकीच’ – नवाब मलिक
- मी गुन्हा केला असेल तर निश्चितपणे कानूनी कारवाई करा ; त्याला मी सहकार्य करणार – किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
