Share

“ग्रामपंचायत भाजपची, सोसायटी भाजपची तरी…”; दरेकरांपुढे शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

Published On: 

सातारा: विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे आज सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी दरेकर यांनी काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. एका शेतकऱ्याने देरेकर यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. २४ तास लोडशेडिंग आहे, आणि आपण म्हणतो शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहीजे. कशी प्रगती होणार?, असा प्रश्न शेतकऱ्याने दरेकरांना विचारला.

शेतकऱ्यानी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना प्रवीण दरेकर म्हणाले, “हे नालायक सरकार सत्तेत बसलं आहे. माझं सरकार असत तर एका मिनिटात सांगितलं असतं की हे सगळं बदलून टाकू पण आता लोडशेडिंग नाही तर सारकारंच बदलून टाकू. तेव्हा प्रश्न सुटतील त्यासाठी तुम्ही आम्हाला आशिर्वाद द्या”, असं दरेकर म्हणाले.

यावर काही शेतकरी दरेकरांना म्हणाले, आशिर्वाद जाऊद्या पण, ग्रामपंचायत भाजपची आहे, सोसायटी भाजपची आहे तरी अडचणींचा सामना करावा लागतो. यावर दरेकर काहीतरी होईल असे, म्हणत निघून गेले. सातारा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नित्रळ येथे श्री केदारनाथ धाम पंच देवालय संस्थान तर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण लोकार्पण सोहळ्यात दरेकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित भाविक व ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!