🕒 1 min read
औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यास प्रयत्न करणार असल्याचे महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतपिकांचे नुकसान, जीवीतहानी तसेच देण्यात येणाऱ्या तातडीच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला.
राज्यमंत्री म्हणाले की, ‘अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात रस्ते, पुल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा प्रस्ताव देखील सादर करावा. तसेच मुख्य रस्त्यांच्या बाजुला झालेले अतिक्रमण तात्काळ काढण्याची कार्यवाही करावी. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता रोगराई टाळण्यासाठी रस्त्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पथकांची नेमणुक करावी. जिल्ह्यातील तिर्थक्षेत्रांचा दर्जा वाढविण्याबाबत प्रशासनाने प्रस्ताव सादर करावा असेही निर्देश महसुल राज्यमंत्री यांनी दिले.’
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश गटणे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल आदी अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे या वेळी सत्तार यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- नर्सिंग ‘एएनएम’ अभ्यासक्रमांची उद्यापासून परीक्षा; मराठवाड्यातील २० केंद्रावर बैठक व्यवस्था
- ‘ही नौटंकी असली तरी मोदींनी यांना कुठून कुठपर्यंत आणले आहे’, राणे यांची बोचरी टीका
- येऊ कशी तशी मी..’फेम अन्विताचा ट्रेंडिग गाण्यावरचा दिलखेच ‘ठूमका’
- शेतकऱ्यांची चेष्टा केल्याप्रकरणी मंत्रिमंडळातून वडेट्टीवार यांची हकालपट्टी करा- लोणीकर
- ‘साहेब, आमची दिवाळी गोड करा; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून मन सुन्न झाले’, फडणवीसांच्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
