जालना : मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहे. अशा परिस्थितीत मंत्री पिक विमा कंपनीच्या मालकाला अटक करण्यासंदर्भात वांझोट्या आणि बेजबाबदार घोषणा करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी संताप व्यक्त करित राज्यसरकारच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढले.
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आपण केलेल्या घोषणे प्रमाणे तात्काळ वेळ न दवडता शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत देण्याचे घोषित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकरी उध्वस्त झाला असून प्रत्येक जिल्ह्यात ५ ते १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीचे, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीके संपूर्ण उपमुख्यमंत्री अजित पवार वाहून गेलेली आहेत. या संकटसमयी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहुन त्यांना मदत करण्याची गरज असल्याचे लोणीकर यांनी लेखी स्वरूपात पत्राद्वारे म्हटले आहे.
लोणीकर म्हणाले की, ‘पिक विमा कंपन्या मनमानी कारभार करत आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पीकविमा कंपन्याच्या मनमानी कारभारावर बोलताना सांगितले होते की, पीकविमा कंपन्या सरकारचे एकत नाही, अश्या पीकविमा कंपन्याच्या मालकावर कार्यवाही करून त्यांना जेल मध्ये टाकू, अशी घोषणा त्यांनी केली होती. त्याला लोणीकर यांनी जर पिक विमा कंपनीच्या मालकाला अटक केली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर चांदीचा रथ देऊन यथोचित सत्कार करेल, असे प्रति आव्हान दिले होते. परंतु पंधरा दिवस उलटून गेले असताना देखील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा वांझोटी व शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे, अशा शब्दात लोणीकर यांनी समाचार घेतला.
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे किती पीकविमा कंपनी मालकांना जेल मध्ये टाकले? असा सवाल सुद्धा लोणीकर यांनी केला. पीकविमा कंपनी मालकाना जेल मध्ये घालण्याच्या पोकळ घोषणा म्हणजे बोलाचा भात अन बोलाची कढी असा प्रकार असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची वडेट्टीवार यांनी माफी मागावी, अन्यथा शेतकऱ्यांची चेष्टा केल्याप्रकरणी मंत्रिमंडळातून वडेट्टीवार यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीदेखील यावेळी लोणीकर यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या तर 5 पण जागा आल्या नसत्या; चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला डिवचलं
- सुभाष साबणे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने शिवसेनेत अस्वस्थता?
- ‘उत्तर प्रदेशात तर जनरल डायरचे सरकार आहे’, बाळासाहेब थोरातांचा संताप
- ‘लक्ष्मीसाठी दार उघडा, खोट्या शपथा घ्या, पैसे घ्या, पण मतदान साबणेंना करा’, सदाभाऊंचे अजब आवाहन
- ‘..तर मी माझी मालमत्ता गिरीश महाजन यांना दान देईल’, एकनाथ खडसेंचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
